
– सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवडय़ात विधान भवनाच्या इमारतीत आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर याच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. या मारहाणीत जखमी झालेल्या नितीन देशमुख यांचा आव्हाड आणि रोहित पवार हे दोघे शोध घेत होते. मात्र पोलिसांकडून सहकार्य मिळत नव्हते. सुरुवातीला ते मरीन ड्राइव्ह व नंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेले. तेथे नितीन देशमुख यांच्याविषयी विचारणा केली. तेव्हा रात्रपाळीला हजर असलेले उपनिरीक्षक उडवाउडवीची उत्तरे देत होते, हातवारे करत होते. त्यामुळे रोहित पवार संतापले होते.



























































