
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले. एकीकडे 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले मात्र दुसरीकडे अनेक छोट्या छोट्या गोष्टीवर जीएसटी लावण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बोचरी टीका केली आहे. अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची गरज आहे, असे म्हणतं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला.
पॉपकॉर्नच्या चवीनुसार #GST लावून कायमच मध्यमवर्गीयांची चव बेचव करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची गरज आहे. केवळ आकड्यांचा खेळ न करता मध्यमवर्गीयांचे चार पैसे कसे वाचतील, याकडं अधिक लक्ष द्यावं. एकीकडं वाढत चाललेली महागाई…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 1, 2025
अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर रोहित पवार यांनी ट्वीट करत मध्यमवर्गीयांची बाजू मांडली आहे. ‘पॉपकॉर्नच्या चवीनुसार #GST लावून कायमच मध्यमवर्गीयांची चव बेचव करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची गरज आहे. केवळ आकड्यांचा खेळ न करता मध्यमवर्गीयांचे चार पैसे कसे वाचतील, याकडं अधिक लक्ष द्यावं. एकीकडं वाढत चाललेली महागाई तर दुसरीकडं जीएसटीच्या भारामुळे माध्यमवर्गीयांचं कंबरडं मोडलंय, असे म्हणत रोहीत पवार यांनी अर्थमंत्र्यावर हल्लाबोल केला.
यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर स्लॅब सुधारून किमान 10 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना आयकर भरण्यापासून सूट द्यावी. तसंच किमान 15 ते 20 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी प्राप्तीकराचे दर कमी करावेत, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटद्वारे केली आहे.
गृहकर्जाचा व्याजदर जास्त असल्याने आजही लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांचं घराचं स्वप्न अपूर्ण आहे, ते पूर्ण व्हावं म्हणून गृहकर्जावरील व्याजदर कमी करावेत. तसंच आज आरोग्यावरचा खर्च कुणालाही परवडत नाही, या पार्श्वभूमीवर आरोग्य विम्यावरचा जीएसटी कमी केल्यास मध्यमवर्गीयांना अधिक प्रमाणात आरोग्य विमा उतरवता येईल. म्हणून या बजेटमधून सर्वसामान्यांचं दैनंदिन आयुष्य सुकर होईल, असे निर्णय अर्थमंत्र्यांनी घ्यावेत, अशी विनंती रोहीत पवार यांनी केली आहे.
































































