‘खतरों के खिलाडी’ मध्ये झळकणार मराठी अभिनेत्री

2140
amruta-khanvilkar

चित्रपट निर्माता रोहित शेट्टी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर ‘खतरों के खिलाडी’ हा रिअॅलिटी शो घेऊन येत आहे. हा कार्यक्रमात तो स्वत: ‘होस्ट’ (निवेदक) म्हणून काम बघतो. या शोमध्ये मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी होणार असून नवनवीन चित्त-थरारक स्टंट करताना दिसणार आहेत. ‘डर की युनिव्हरसिटी’ या थीम अंतर्गत या शो चे स्टंट असून याचे चित्रीकरण हे बल्गेरिया येथे करण्यात आले आहे. हा 10 वा सीझन असून शो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी टी. व्ही. वर दाखविण्यात येणार आहे.

amruta-khanvilkar-new

या शो मध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर दिसणार आहे. अमृता सोबत करण पटेल, अदा खान, शीवीन नारंग, तेजस्वी प्रकाश, करिष्मा तन्ना आणी डांसर धर्मेश येलांडे इ. कलाकारांचा सहभाग आहे. करिष्मा तन्ना सांगते की या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निर्माते चार वर्षापासून तिला विनंती करत होते. अखेर तिने प्रस्ताव स्वीकारला. पुढे ती म्हणाली की, पोहणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं आणि तरी देखील हा शो मी खूप एन्जॉय केला.

रोहितबद्दल देखील करिष्मा भरभरून बोलली. शूटिंग करत असताना अडचणी यायच्या मात्र रोहित हा चांगला मार्गदर्शक असल्याने तो सर्वांना स्टंट करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा. अर्थात असं असलं तरी यापुढे स्टंट करावे लागतील अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाही, असंही तिने स्पष्ट केलं.

ट्विटरवर 100K चा टप्पा गाठणारी अमृता खानविलकर ठरली पहिली मराठी अभिनेत्री !

आपली प्रतिक्रिया द्या