छपरी, Xड्या! नव्या व्हिडीओवरून रोहित समर्थकांची हार्दिकला शिवीगाळ

इंडियन प्रिमिअर लीगमध्ये मुंबई इंडीयन्स या संघाच्या कर्णधारपदावरून रोहित शर्मा याला हटवून त्याच्या जागी हार्दिक पांड्याला नेमण्याचा निर्णय संघ प्रशासनाने घेतला होता. या निर्णयानंतर रोहित शर्मा याचे समर्थक जबरदस्त संतापले असून त्यांनी हार्दिक पांड्या याला शिव्यांची लाखोली वाहिली होती. यानंतर हार्दिक पांड्या जायबंदी झाला होता ज्यामुळे तो मुंबई इंडीयन्सचे नेतृत्व करू शकणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र हार्दिक पांड्या तंदुरुस्त व्हायला लागला असून त्याने गोलंदाजीचा सराव करण्यासही सुरुवात केली आहे. पांड्याने X वर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये तो 100 टक्के तंदुरुस्त होण्यासाठी व्यायाम करताना दिसत आहे.

कपाळपट्टीवर लाल रुंगाचा रुमाल बांधून अंगातील टीशर्ट काढून टाकत उघडाबंब होत व्यायाम करतानाचा हार्दिक पांड्याचा हा व्हिडीओ आहे. त्याच्या या व्हिडीओनंतर रोहितसेना पुन्हा पेटली असून त्यांनी हार्दिकला पुन्हा शिव्या घालायला सुरुवात केली आहे. यातल्या एकाने हार्दिकला छपरी म्हणून हिणवलंय.

काही रोहित समर्थकांनी म्हटलंय की काहीही केलंस तरी विश्वचषकात तू जायबंदी होणार आहेस.