
सामना ऑनलाईन । मँचेस्टर
हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ओल्ड ट्रॅफोर्डवरील विश्वचषक लढतीत रोहित शर्माला तिसरे पंच मायकेल गॉग यांनी संशयास्पद पद्धतीने बाद ठरवले. केमार रोचच्या गोलंदाजीवर खेळत असताना चेंडू रोहितची बॅट आणि पॅड यांच्यामधून यष्टीरक्षकाकडे गेला. विंडीजच्या खेळाडूंनी रोहित बाद असल्याचं अपील केलं, मात्र पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी ते फेटाळून लावलं. टी.व्ही. पंचांच्या पाहणीतही अल्ट्रा एज प्रणालीवर चेंडू स्पष्टपणे बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेल्याचं सिद्ध होतं नव्हतं. मात्र टीव्ही पंच मायकल गॉग यांनी रोहित बाद असल्याचा निर्णय दिला.यानंतर रोहित शर्माने फारसा वाद न घालता मैदान सोडणे पसंत केलं.
♂️ pic.twitter.com/0RH6VeU6YB
— Rohit Sharma (@ImRo45) June 28, 2019
मात्र सामन्यानंतर रोहितने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक सूचक फोटो ट्विट करत तिसऱ्या पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शिवाय पंचांच्या कामगिरीवर भडकलेल्या चाहत्यांनी या ट्विटवरही रोहितची बाजू घेत त्याच्यावर टीव्ही पंचांनी अन्यायच केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Was Rohit Sharma out? #WIvIND #CWC19 pic.twitter.com/zynCNkma8T
— Circle of Cricket (@circleofcricket) June 27, 2019
#RohitSharma when a drunken empire gives decisions this will happen…… pic.twitter.com/rizdjdHBmt
— chandra sekhar (@chandra85001999) June 27, 2019





























































