
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रोहित शेखर तिवारी याचा गळा आवळून, उशीच्या मदतीने त्याचा श्वास रोखून त्याची हत्या त्याची निर्दयी पत्नी सुप्रीम कोर्टाची वकील अपूर्वा हिनेच केली अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली. रोहित शेखर तिवारी हा दिवंगत माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी यांचा पुत्र असल्याने त्याच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीकडे देशाचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आपल्या नवऱ्याचा 16 एप्रिल रोजी रात्री एक वाजता हा खून पचवण्यासाठी अपूर्वाने घराच्या त्या रूममधील सर्व पुरावेही नष्ट केले आणि हा सर्व कारभार तास-दीड तासात तिने आटोपला असे पोलिसांनी सांगितले.
























































