2.5 कोटींचे हिरेजडीत घड्याळ, 7 कोटींची रोकड अन् दागिने; तंबाखू व्यापाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंशीधर तंबाखू ग्रुपवर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. कंपनीचे मालक के.के. मिश्रा यांच्या दिल्ली, कानपूर आणि मुंबईतील निवासस्थानावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू असून या छापेमारीमध्ये डोळे दिपवणारी संपत्ती समोर आली आहे.

बंशीधर तंबाखू ग्रुपचे मालक के. के. मिश्रा यांच्या निवासस्थानवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची लक्झरी घड्याळं आढळी आहेत. यात 2.5 कोटी रुपयांच्या हिरेजडीत घड्याळाचाही समावेश आहे. आयकर विभागाला अशी 5 घड्याळं सापडली असून याची किंमत निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही किंमतही निश्चित होईल आणि त्याची माहितीही समोर येईल.

आतापर्यंतच्या कारवाईमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 4.30 कोटींची रोकड आणि अडीच ते तीन कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. यासह अनेक महागड्या गाड्याही येथे आढळून आल्या आहेत. बंशीधर तंबाखू ग्रुपची वार्षिक उलाढाल 20 ते 25 कोटी रुपये आहे. मग 60 ते 70 कोटी रुपयांच्या रोल्स रॉयल्स फँटम, फरारी और लेम्बोर्गिनी यासारख्या लक्झरी गाड्या कशा खरेदी केल्या? असा सवाल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या मालकाला केला आहे.

बंशीधर तंबाखू ग्रुपने कोणत्याही कागदपत्रांशिवाय मोठमोठ्या पान मसाला ग्रुपला माल विकला आहे. याचाच अर्थ कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता पान मला ग्रुपने या कंपनीकडून माल घेतला आहे. त्याआधी आकरविभाग या मोठ्या पान मसाला ग्रुपरही कारवाईच्या तयारीत आहे.

दरम्यान, बंशीधर तंबाखू ग्रुपच्या मालकाच्या गुजरातमधील घरावर, गुजरातमधील उंझा येथील कारखान्यावर आणि ही कंपनी गुंटूरमधील ज्या कंपनीकडून माल खरेदी करते त्या कंपनीच्या ठिकाणावरही आयकर विभागाने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. यातूनही आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.