रॉनी रॉड्रिक्स यांचे शैक्षणिक संस्थेद्वारे उल्लेखनीय योगदान   

सिनेबस्टर या चित्रपटविषयक मासिक आणि ऑनलाइन पोर्टलचे मालक रॉनी रॉड्रिक्स आता मनोरंजन क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही आपले योगदान देण्याच्या तयारीत आहेत.  त्यांनी पीबीसी शैक्षणिक व आर्थिक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून रॉनी रॉड्रिक्स हे देशविदेशातील गरजू विद्यार्थ्यांना विशेष आर्थिक मदत करणार आहेत. नुकतीच त्यांनी यासंदर्भात घोषणा केली. या कार्यक्रमास चित्रपटसृष्टीतील धीरजकुमार, संगीतकार दिलीप सेन, तसेच पंकज बेरी, आरती नागपाल, दर्शनकुमार, नायरा बॅनर्जी इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजा रॉय या संस्थेचे प्रमुख सल्लागार असून ही कंपनी अमेरिका व सिंगापूर येथे विशेष कामकाज पाहील. हिंदुस्थानातून निशा वर्मा संस्थेचे काम पाहतील. एखाद्या मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीने अशा पद्धतीने कार्यविस्तार करणे ही उल्लेखनीय बाब आहे.