ललित पाटील पलायन प्रकरण, रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना पुणे पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणात पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याला पुणे पोलिसांनी तळोजा जेलमधून ताब्यात घेतले. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पुण्यातील रोझरी एज्युकेशन ग्रुपचा संचालक विनय अरहाना याला अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने अटक केली होती. सध्या तो तळोजा कारागृहात आहे. मात्र आजाराचे कारण देऊन तो ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. याचदरम्यान त्याने ललित पाटील याला पळून जाण्यात मदत केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी अरहाना याचा ताबा मागितला होता. न्यायालयाने पुणे पोलिसांना अरहानाचा ताबा घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी अरहाना याचा तळोजा कारागृहातून ताबा घेतला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.