डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र लावायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

आज संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण काढणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, हिंदुस्थानच्या संविधानाचे निर्माते डॉ. आंबेडकरांचे एक तैलचित्रही मंत्रालयाच्या शासकीय इमारतीत लावण्यात येऊ नये. मुख्यमंत्र्यांना तेवढा वेळ नाही का, असा सवाल आज विरोधकांनी सरकारला केला. मुख्यमंत्र्यांकडे गेल्या वर्षभरापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे; पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

संविधान दिनानिमित्त विधान परिषदेत सभापतींनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे यांनी हा महत्त्वाचा विषय उपस्थित केला. ज्या इमारतीतून राज्याचा कारभार हाकला जातो त्या शासकीय इमारतीत डॉ. बाबासाहेबांचे तैलचित्र लावल्यास त्यांना उचित सन्मान मिळेल; परंतु यासाठी मुख्यमंत्री वेळ काढू शकत नाहीत का, असा सवाल मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. संविधान दिनाचे औचित्य साधून आजच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र मंत्रालय इमारतीत लावावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.