आरपीएफ जवानाने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण, सीसीटीव्हीत दृश्य कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

मुंब्रा रेल्वे स्थानकावर एक प्रवासी ट्रेन मधून पडला. गाडीखाली येण्यापूर्वीच तिथल्या आरपीएफ जवानाने धाव घेत त्याचे प्राण वाचवले. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नसीम शेख असे प्रवासीचे नाव असून जवानाचे नाव अजय वर्मा आहे.

मुंब्रा स्थानकावर नसीम शेख हे धावत्या गाडीतून पडले. खाली पडल्यानंतर त्यांचा तोल जाऊन ते गाडीखाली जात होते. तेव्हा ड्युटीवर असलेले आरपीएफ जवान अजय वर्मा यांनी वेळीच धाव घेत त्यांना सावरले व त्यांचे प्राण वाचवले. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला.