
सामना ऑनलाईन । चेन्नई
धावती ट्रेन पकडताना होणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसतो. तशीच घटना सोमवारी तामीळनाडूतील इग्मोर रेल्वे स्थानकात घडली. एक प्रवासी धावती ट्रेन पकडताना चिरडला गेला असता पण तिथे असलेल्या रेल्वे सुरक्षा गार्डने प्रसंगावधान राखत त्याला बाहेर खेचलं आणि प्रवाशाचा जीव वाचवला.
#WATCH: Railway Protection Force (RPF) personnel saved a passenger’s life by rescuing him from falling, while he was boarding a train at Egmore Railway Station’s platform. The passenger didn’t suffer any injury. #TamilNadu (12.11.18) pic.twitter.com/OdNDYMdu2y
— ANI (@ANI) November 14, 2018
इग्मोर रेल्वे स्थानकातून प्रवास करणारा एक प्रवासी धावती गाडी पकडण्याच्या नादात जोरात आपटला. तो गाडीच्या खाली जात असल्याचे रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या आरपीएफला दिसले. त्याने तात्काळ धाव घेतली आणि रेल्वेसोबत फरफटत खाली जात असलेल्या प्रवाशाला खेचून बाहेर काढले. त्यामुळे प्रवाशाचा जीव वाचला. दरम्यान, गाडी पकडताना आपटून फरफटत गेल्यानंतर ही त्या प्रवाशाला जरा सुद्धा खरचटले नाही.
























































