ज्युनिअर एनटीआरची चाहत्यांना खास भेट;‘आरआरआर’चे नवीन पोस्टर लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत. टिझर आणि नवनवीन पोस्टरमुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आज अभिनेता ज्युनिअर एनटीआर याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘आरआरआर’मध्ये ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील असून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील अलुरी सिथारामराजू व कोमराम भीम या स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहे. पाच भाषांमध्ये चित्रपट रिलीज होईल.