हिंदू हित म्हणजेच राष्ट्रीय हित – मोहन भागवत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जात, पंथ, भाषा आणि इतर अस्मितांच्या हितापेक्षा राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. ‘हिंदू हित म्हणजेच राष्ट्रीय हित’ हे पहिले प्राधान्य असले पाहिजे. त्यामुळेच आपण एक बलवान आणि सक्षम राष्ट्र बनू आणि दुर्बलतेचा विचार सोडून देऊ, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी क्यक्त केले.

स्वामी रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले, आम्हाला संपवण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. पण हजारो वर्षे जुना सनातन धर्म आजही शतकानुशतके तसाच टिकून आहे. ज्यांनी हिंदूंना नष्ट करण्याचा प्रयत्न केला तेच आता जगभर आपसात भांडत असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदू कोणाच्या विरोधात नाही

कोणाच्याही विरोधात हिंदू नाही. एकमेकांमध्ये भांडणे लागतील, अशा गोष्टीत आम्ही जाणार नाही. स्वाभिमानाने जगू आणि विश्वाचे पालनपोषण करू, असे मोहन भागवत म्हणाले.