अयोध्या जमीन घोटाळय़ात आरएसएसचा ‘ऍक्शन मूड’; चंपत राय, अनिल मिश्रांना मंदिर ट्रस्टच्या कामापासून दूर ठेवण्याच्या हालचाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या जमीन खरेदीतील घोटाळ्याच्या आरोपानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘अॅक्शन मूड’मध्ये आला आहे. संघाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि अनिल मिश्रा या दोघांना ट्रस्टच्या कामापासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी ही गुप्त मोहीम हाती घेतली असून यासाठी ते अयोध्येत हजेरी लावणार आहेत.

श्रीराम मंदिर जमीन खरेदीतील कथित घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना संघाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱयांचा जाहीररीत्या बचाव केला. मात्र गुप्तपणे हालचाली सुरू करीत ट्रस्टच्या जबाबदार पदाधिकाऱयांवर वक्रदृष्टी रोखली आहे. घोटाळ्यात ज्या पदाधिकाऱयांची नावे समोर आली आहेत ते पदाधिकारी कायदेशीररीत्या ट्रस्टवर राहतील, मात्र ट्रस्टमध्ये त्यांचा प्रभाव संपुष्टात आणण्याचे संघाचे प्रयत्न आहेत. त्याच अनुषंगाने चित्रकूटमध्ये संघाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना बोलावण्यात आले आहे. राय यांना ट्रस्टच्या कामापासून दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेच्या पेंद्रीय उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे पुढेही ट्रस्टला सहकार्य असेल. याचवेळी ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनाही संघ विचारसरणीच्या दुसऱया संघटनेची जबाबदारी देऊन ट्रस्टच्या कामापासून दूर करण्याच्या हालचाली आहेत. श्रीराम मंदिर उभारणीसाठी दोन कोटींच्या जमिनीचा 18 कोटी रुपयांमध्ये खरेदी व्यवहार करून घोटाळा केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर सध्या ट्रस्टने नवीन जमिनीच्या खरेदीवर बंदी घातली आहे.

भैयाजी जोशींचे संपूर्ण प्रकरणावर लक्ष

मंदिर जमीन खरेदीतील घोटाळ्याच्या आरोपानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचा जाहीररीत्या बचाव आणि गुप्तरीत्या ट्रस्टवर पंट्रोल अशी मोहीम आरएसएसने हाती घेतली आहे. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सरकार्यवाह भैयाजी जोशी हे या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. विरोधकांना आणखी टीकेची संधी मिळू नये म्हणून ट्रस्टच्या पदाधिकाऱयांना पदावर कायम ठेवले जाणार आहे, परंतु ते स्वतंत्रपणे काम करू शकणार नाहीत. यापुढे ट्रस्टवर संघाचे थेट नियंत्रण राहणार आहे.