मला तुझ्या तोंडावर पादावसं वाटतंय, दिग्दर्शकाच्या अश्लील बोलण्याने अभिनेत्रीला धक्का

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अनेक अभिनेत्रींनी मीटू या मोहिमेच्यावेळी त्यांच्यासोबत घडलेले प्रकार सांगितले आहेत. अभिनेत्री रुबिना दिलाईक हिने देखील तिच्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. रुबिना हिला एका दिग्दर्शकाला भेटायला गेली असता फारच वाईट अनुभव आला होता. त्या दिग्दर्शकाने चक्क ‘मला तुझ्या तोंडावर पादावसं वाटतंय’ असं तिला सांगितलं होतं. त्या घटनेनंतर रुबिनाने मोठ्या पडद्यावर कधीच काम करायचं नाही असं ठरवलं असल्याचे समजते.

rubina-dilaik

शक्ती, छोटी बहू अशा प्रसिद्ध मालिकांमधून गाजलेली अभिनेत्री रुबिना दिलाईक सध्या तिचा नवरा अभिनव कोहली सोबत बिग बॉसच्या घरात बंद आहे. त्यादरम्यानच तिच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तिने हा भयंकर प्रकार सांगितला आहे. ‘मी चित्रपटात काम करायचं म्हणून एका दिग्दर्शकाला भेटायला गेले. त्यांनी मला विचारले की तु माझा हा हा चित्रपट पाहिला आहेस का? मी त्यांना नाही असं उत्तर दिलं व सांगितलं की मी तो चित्रपट रिलीज झाला तेव्हा शाळेत होते. शिमलाला राहायचे. माझे कुटुंब आम्हाला या सगळ्या गोष्टी करायला त्यावेळी परवानगी नाही द्यायचे. मी असे सांगितल्यावर तो दिग्दर्शक माझ्याकडे पाहात म्हणाला की मला तुझ्या तोंडावर पादावसं वाटतंय. मी ते ऐकून हादरलेच. त्यानंतर तो माझ्याकडे पाहून हसू लागला’, असे रुबिनाने सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या