
सामना ऑनलाईन । मुंबई
संजीवनी, साराभाई व्हर्सेस साराभाई अशा मालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्यावर दोन जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडायला जात असताना तिच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
For the first time in my life I experienced #RoadRage!2 #Hooligans on a bike smashed my car window and kept hurling abuses at me in front of my 5yr old son!I dint note down the number or even take their pics-my only agenda was to get my petrified child n his caretaker to safety! pic.twitter.com/YJVZYhIDzy
— Rupali Ganguli (@TheRupali) August 4, 2018
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, वर्सोव्याला राहणारी रुपाली शनिवारी सकाळी आपल्या ४ वर्षांच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होती. वाटेत एका बाईकवरून आलेल्या दोन तरुणांनी तिची गाडी अडवली आणि तिच्याशी भांडायला सुरुवात केली. या भांडणातच त्यांनी रुपालीच्या गाडीची काच तोडली. या हल्ल्यामुळे रुपालीला गंभीर दुखापत झाली.
These were the guys! The one on the left broke the glass with a punch ! Wish he would put his strength to better use than scaring women and children #RoadRage @MumbaiPolice pic.twitter.com/Kn6GeETjJh
— Rupali Ganguli (@TheRupali) August 4, 2018
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित तक्रार दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणात दोन तरुणांना अटक झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी लगेचच या दोन आरोपींना अटक केल्यामुळे रुपालीने मुंबई पोलिसांचे आभारही मानले आहेत.



























































