रुपया 18 पैशांनी घसरला

rupee-fall

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 18 पैशांनी घसरला आणि 85.94 वर स्थिरावला. हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे रुपयात दिवसेंदिवस घसरण होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.