रुपीक फॉर इंडियाची तंत्रज्ञानकेंद्री गोल्ड मोनेटायझेशनला चालना; अनेक संधी उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुपीक फॉर इंडिया या वैचारक कायक्रमाने आपल्या पहिल्या आवृत्तीमध्ये, देशातील सुमारे 2 ट्रिलियन डॉलर मूल्याच्या सोन्याचे रोखीकरण करण्यासाठी परसंस्था तंत्रज्ञानाचा वापर कसा करू शकते आणि त्याद्वारे देशातील एक अब्ज नागरिकांना जाणवणाऱ्या वित्त पुरवठ्यासंबंधात समस्या कशा सोडवू शकते, यावर देशातील तज्ज्ञांनी आपली मते मांडली

आरबीआयचे माजी उपगव्हर्नर आर. गांधी यांच्या बीजभाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अरुंधती भट्टाचार्य, रुपीकचे संस्थापक व सीईओ सुमीत मणियार यांनीही त्यांची मते मांडली. देशातील नागरिकांनी वित्तपुरवठा उपलब्ध करून देणे आणि सोन्याची गुंतवणूक म्हणून बघण्याच्या धोरणात बदल होणे यावर यात चर्चा झाली. रुपीककडून बाजारात डोअरस्टेप सुवर्णकर्जे उपलब्ध आहेत आणि डिजी लॉकर व बाय नाऊ पे लेटर (बीएनपीएल) या सुविधा लवकरच सुरू केल्या जाणार आहेत. तसेच गोल्ड पॉवर कार्डस आणिण गोल्ड टेलर मशिन (जीटीएम) सध्या प्रायोगिक टप्प्यामध्ये आहेत. अनेक घरांमध्ये कोणत्याही उपयोगाशिवाय पडून असलेले सोने बाहेर आणून देशातील पत आव्हानांवर मात करण्यासाठी ही उत्पादने उपयुक् आहेत आणि सोन्याचे रोखीकरण करून सद्यपरिस्थती बदलण्यासाठी उत्तम स्थितीत आहे. यामुळे आर्थिक समावेशनाची प्रक्रिया आणि आर्थिक वाढीला वेग येणार आहे.

रुपीकचे संस्थापक व सीईओ सुमीत मणियार म्हणाले, “देशात गोल्ड मोनेटायझेशन संरचना उभारण्यासाठी तंत्रज्ञान व नवोन्मेष हे दोन आधारस्तंभ आहेत. गोल्ड टेलर मशिन, डिजिलॉकर, गोल्ड पॉवर कर्ड, क्रेडिट कार्ड आणि बाय नाऊ पे लेटर उत्पादने या क्षेत्रात नव्या पाया उभआरणार आहेत. या पायावरच देशातील सोन्याचे चलनीकरण होणार आहे. रुपीकमध्ये आम्ही या उद्दिष्ठावरच लक्ष केंद्रीत केले आहे आणि हे शक्य तेवढ्या जास्त ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे ते म्हणाले.

रिझर्व बँकेचे माजी उपगव्हर्नर आर. गांधी यांनी आर्थिक वाढीसाठी सोन्याच्या चलनीकरणाच्या मुद्द्यला पाठिंबा दिला. कुटुंबांमध्ये सोन्याच्या स्वरूपात साठवला जाणारा प्रत्येक रुपया, गोल्ड मोनेटायझेशनच्या माध्यमातून, भांडवली गुंतवणूक म्हणून वापरला गेला पाहिजे आणि त्यायोगे परदेशातून भांडवलाची आयात करण्याची गरज कमी केली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.

सेल्सफोर्स इंडियाच्या अध्यक्ष व सीईओ अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, “सोने ही सर्वांच्या आवडीची मालमत्ता आहे. देशातील प्रत्येकाकडे ते असतेच.वाढत्या डिजजटायझेशनमुळे लोकांचा दृष्टीकोनही बदलत आहे. आपल्या खात्यातील रोखता वाढवण्यासाठी सोन्याच्या स्वरूपातील मालमत्तेचे पैशात रूपांतर करण्यास तयार असलेल्या संभाव्य ग्राहकांसाठी रुपीक, एक टेक कंपनी म्हणून, जागा निर्माण करत आहे. यामुळे मॅक्रो स्तरावरील भांडवलाच्या तुटवड्यासारख्या मोठ्या समस्या सोडवल्या जाण्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच या कायक्रमात ‘हाऊ टू बिल्ट इंडियाज गोल्ड मोनेटायझेशन (गोमोन) प्लेबुक?’ आणि ‘भारटेक: अनलॉकिंग क्रेडिट अॅट स्केल’ या विषयांवर चर्चा झाली.