रशियावर ऑलिम्पिकबंदीची टांगती तलवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्ल्ड ऍण्टी डोपिंग एजन्सीला (वाडा) आपल्या खेळाडूंचा डाटा उपलब्ध न करून दिल्याने रशियावर टोकियो ऑलिम्पिकसाठी बंदी घालण्याची शक्यता बळावली आहे. डोपिंगमध्ये सापडलेल्या आपल्या खेळाडूंचा डाटा रशियाने डिलीट केल्याचा ‘वाडा’ला संशय आहे. तीन आठवडय़ांत खेळाडूंच्या डाटाचा अहवाल सादर करा नाहीतर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ‘वाडा’चे चेअरमन जोनाथन टेलर यांनी दिला आहे.

जोनाथन टेलर म्हणाले, रशियाने डोपिंगमध्ये सापडलेल्या आपल्या खेळाडूंचा डाटा डिलीट केल्याचे पुरावे ‘वाडा’ला मिळाले आहेत. तीन आठवडय़ांत त्यांनी हा डाटा उपलब्ध करून दिला नाही तर रशियाला ही बाब महागात पडणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रशियाची टोकियो ऑलिम्पिकबरोबरच वर्ल्ड चॅम्पियनशिपमधूनही हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.