
हिंदुस्थानच्या नौदलाची ताकद येत्या काळात आणखी खतरनाक होणार आहे. रशियाने हिंदुस्थानला कॅलिब्र-पीएल सबमरिन लाँच क्रूझ मिसाईलचा प्रस्ताव दिला आहे. 1500 किलोमीटर एवढी त्याची मारक क्षमता आहे. हा प्रस्ताव हिंदुस्थानने स्वीकारला तर हिंदुस्थानच्या पाणबुडय़ा समुद्रातून शत्रूच्या दूरवरच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करू शकतात. यालाच सायलंट स्ट्राईक फीचर असे म्हणतात. म्हणजे शत्रूला समजणार नाही की हल्ला झालाय.
कॅलिब्र-पीएल क्षेपणास्त्रांना पाण्याच्या आत लपलेल्या पाणबुडय़ांवरून लाँच केले जाते. लाँचनंतर क्षेपणास्त्र कमी उंचीवर उडत रडारला चकवा देते आणि शेवटी जलदगतीने टार्गेटवर हल्ला करते. ही सर्वाधिक खतरनाक अशी सबमरिन लाँच स्ट्राईक मिसाईल मानली जाते. हिंदुस्थान आपली नौदल क्षमता अत्याधुनिक करण्याच्या प्रयत्नात असताना रशियाने हा प्रस्ताव दिलेला आहे.
वैशिष्टय़े काय?
मारक क्षमता ः सुमारे 1500 किमी.
लाँच प्लॅटफॉर्म ः 533 एमएम टॉर्पिडो टय़ूब. सध्याच्या स्कॉर्पिओ पाणबुडय़ांवरून लाँच होऊ शकते.
अचूक हल्ला ः जीपीएस आणि उन्नत नेव्हिगेशन सिस्टम.
रडारपासून वाचण्याची क्षमता ः कमी उंचावर उड्डाण करून रडारला धोका देऊ शकते.
शत्रूचे हवाई तळ, कमांड सेंटर, बंदरे, विद्युत ग्रीड उद्ध्वस्त करण्याची क्षमता.































































