पुतीन यांचे महिला सफाई कर्मचारीशी होते संबंध, आता महिला आहे 700 कोटींची मालकीण…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आपल्या महिला सफाई कर्मचारीशी संबंध होते, असा दावा रशियन मीडिया Proekt ने एका वृत्तात केला आहे. ही महिला आता 700 कोटींची मालकीण झाली असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. मात्र या वृत्ताची पुष्टी झाली नसून पुतीन यांच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Proekt च्या वृत्तानुसार, 68 वर्षीय पुतीन यांचे स्वेतलाना क्रिवोनोगिख नावाच्या महिलेशी संबंध होतं. आता ही महिला रशियाच्या सेंट पीटर्सबर्गच्या पॉश भागात राहते. जी पुतीन यांच्या जवळच्या लोकांसाठी सुरक्षित मानली जाते. त्यांच्या या नात्यातून एक मुलीचाही जन्म झाला असून ती 17 वर्षांची आहे. द मॉस्को टाईम्सनेही हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रशियन मीडियाने पुतीन यांची गुप्त मुलगी 17 वर्षीय एलिझावेटा क्रिवोनोगिख असल्याचं सांगितलं आहे. अल्पवयीन असल्यामुळे एलिझावेटाचा चेहरा ब्लर करून प्रकाशित करण्यात आला आहे. Proekt ने फेस रेकोनाईझर तज्ञाच्या तपासणीनंतर सांगितलं आहे की, पुतीन आणि त्यांच्या मुलीचा चेहरा 70 टक्के एकसारखा आहे.

untitled-1-copy

या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, एलिझावेटा हिचा जन्म 2003 साली झाला आहे. त्यावेळी पुतीन यांचे लग्न Lyudmila Shkrebneva यांच्याशी झालं होतं. नंतर दोघांचा घटस्फोट झाला. दरम्यान, पुतीन यांच्या प्रवक्त्याने या संबंधांचे दावे पूर्णपणे नाकारले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या