२१ वर्षाने सापळ्याने उलगडला स्वत:च्याच खुनाचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मॉस्को

रशियातील सैबेरियात एका सापळ्याने २१ वर्षापूर्वीचं त्याच्या मृत्यूचे रहस्य उलगडले आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला शेतात खोदकाम करताना हा सापळा सापडला त्याच्याच पत्नीने सापळा असणाऱ्या व्यक्तीचा खून केला होता. त्यानंतर त्याला घरामागील शेतात तिनं पुरलं होतं. २१ वर्षापासून पोलीस त्या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत होते. पण त्यांना य़श मिळाले नाही. मात्र सापळ्यानेच या खूनाच रहस्य समोर आणून आपल्या खुनी प्रेयसीला तुरुंगात पाठवलं आहे.

ही घटना मॉस्कोपासून २२००० किलोमीटरवर असलेल्या लुजिनो गावातील आहे. येथे एक व्यक्ती शेतात भाज्या लावण्यासाठी खोदकाम करत होता. त्याचवेळी त्याला जमिनीत पुरलेला एक सापळा दिसला आणि त्याची बोबडीच वळाली. त्याने तात्काळ पोलिसांना याबद्दल कळवलं. जेव्हा त्याच्या पत्नीला सापळ्याबद्दल कळाले तेव्हा मात्र ती हादरली. यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला व त्यांनी तिला त्याबद्दल विचारले. तशी ती आणखीच घाबरली. शेवटी पोलिसांनी तिला बोलते केले. त्यानंतर तिने सांगितलेले सत्य ऐकून पोलिसांसह तिच्या पतीलाही धक्का बसला.

आरोपी महिलेचे एका ५२ वर्षीय व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते. पण तिला ते संबंध संपवायचे होते. यास समोरची व्यक्ती तयार नव्हती. यावरुन त्यांच्यात १९९७ साली कडाक्याचे भांडण झाले व प्रियकराने तिला संबंध तोडल्यास तुझ्या पतीला सगळे सांगेल अशी धमकी दिली.रोजरोजच्या या जाचाला महिलाही कंटाळली होती. शेवटी एकदाच याचा सोक्षमोक्ष लावावा असे तिने ठरवले व बाजूलाच पडलेल्या कुऱ्हाडीने तिने प्रियकराच्या डोक्यावर वार केले.यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महिलेच्या घरातच घडली होती व त्यावेळी तिचा पती परगावी गेला होता. यामुळे तिने रात्र होताच प्रियकराचा मृतदेह घरामागील शेतात पुरला. त्यानंतर तो कामानिमित्त परगावी गेल्याचे तिने सगळ्यांना सांगितले. पोलिसांनाही तिने आपल्या बोलण्यात फसवले होते. पण अखेर प्रियकराच्या सापळ्यानेच स्वत:च्या खुनाचे रहस्य उलगडले व महिलेली शिक्षा दिली.