रुस्तम-ए-हिंद हरपला, दादू चौगुले यांचे निधन

737

लाल मातीच्या आखाडय़ात नावलौकिक मिळविल्यानंतरही कुस्तीशी नाळ कायम ठेवत बदलत्या प्रवाहानुसार कुस्तीच्या विकासासाठी आयुष्यभर झटणारे रुस्तुम ए हिंद, महान भारत केसरी, डबल महाराष्ट्र केसरी, राष्ट्रकुल रौप्यपदक विजेते पहिलवान दादू चौगुले यांचे रविवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते.

धाप लागल्याने तीन दिवसांपूर्वी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ते कोमामध्ये गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला अन् कुस्तीविश्वातील एक मानाचे पान गळाले. त्यांच्या पश्चात हिंदकेसरी विनोद चौगुले आणि महाराष्ट्र चॅम्पियन अमोल चौगुले ही मुले आणि सुना, नातवंडे असा परिवार आहे. तांबडय़ा मातीतील रांगडा पहिलवान दादू चौगुले यांच्या निधनामुळे अवघ्या कुस्ती पंढरीत शोककळा पसरली.

‘रुस्तम-ए-हिंद’ दादू मामा चौगुले यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच कोल्हापूर जिह्यातील राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या आपल्या जन्मगावा तील तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर मोतिबाग तालमीत दाखल झालेला हा छोटा मल्ल अल्पावधीत वस्ताद गणपतराव आंदळकर यांच्या गळ्यातील ताईत बनला. आंदळकरांनी मोठे परिश्रम घेत दादूंना कुस्तीचे डावपेच शिकवले. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत तयार झालेल्या या महाकाय शरीरयष्टीच्या मल्लाने उत्तरेतील बुरुजबंद मल्लांचा पाडाव केला.

अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत
कुस्तीत नावलौकिक कमावल्यानंतर दादू चौगुले यांनी आयुष्यातील दुसरे पर्व मोतीबाग तालमीत मल्लविद्येचे धडे देण्यात सत्कारणी लावले. कुस्तीसाठी त्यांनी सक्रिय योगदान दिले. कोल्हापूर शहर क जिल्हा तालीम संघाचे ते विद्यमान अध्यक्ष होते. ते अखेरच्या श्वासापर्यंत कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी संघटनात्मक काम करत राहिले.

देदीप्यमान कामगिरी क अल्पपरिचय
जन्मभूमी-अर्जुनकाडा, ता-राधानगरी, जिल्हा-कोल्हापूर
तालीम – मोतीबाग
वस्ताद – बाळू बिरे कस्ताद, गणपतराक आंदळकर वस्ताद

डबल महाराष्ट्र केसरी
1970 -पुणे अधिकेशन (विजेतेपद)
1971 – अलिबाग अधिकेशन (विजेतेपद)
रुस्तम-ए-हिंद केसरी- 3 मार्च 1973 रोजी मुंबई येथे झालेल्या कुस्ती स्पर्ध्येत रुस्तम-ए-हिंद केसरीचे मानकरी ठरले.
महान भारत केसरी – 3 एप्रि-ः 1974 साली न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई.
राष्ट्रीय सुवर्णपदक -28 डिसेंबर 1976 रोजी बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.
शिवछत्रपती पुरस्कार -1974 रोजी महाराष्ट्र शासनकडून दादू मामा चौगुले यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जीवनगौरव ध्यानचंद पुरस्कार – महान हॉकीपटू ध्यानचंद सिंग यांच्या नावावरून देण्यात येणारा जीवनगौरव ध्यानचंद पुरस्कार मागील वर्षी दादू मामांना देऊन गौरविण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या