
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपला 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे समुद्र किनाऱयावर अवतरला होता. त्याने भोगवे, किल्ले निवती सागर किनाऱयावर पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी चाहत्यांबरोबर पह्टो काढून त्यांना अनोखी भेट दिली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेंगुर्ल्याची निवड करून सर्वांनाच सुखद धक्का दिला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्याने सिंधुदुर्ग गाठले आणि जिह्यातील अनेक पर्यटन स्थळांना भेट दिली. परुळे, भोगवे येथील हॉटेलमध्ये सचिनने आपल्या सहकाऱयांसमवेत मुक्काम केला. रविवारच्या संध्याकाळी समुद्र किनाऱयाचा फेरफटका मारताना सचिनला पाहून स्थानिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी सचिनने अनेक चाहत्यांबरोबर आवर्जुन पह्टो काढले आणि अनेकांना ऑटोग्राफही दिले. विशेष म्हणजे सचिनने बच्चे पंपनीबरोबर सेल्फी काढून त्यांचा आनंद द्विगुणीत केला.
विशेष आनंद झाला…
क्रिकेटच्या निमिताने आपलं जगभर फिरणं झालं. परंतु भोगवे-निवती यासारखा सुंदर आणि स्वच्छ सागरकिनाऱयावर फिरताना विशेष आनंद झाल्याचे सचिन तेंडुलकरने सांगितले.
क्रिकेटच्या देवावर शुभेच्छांचा वर्षाव
शतकांच्या शतकाचा विश्वविक्रम रचणाऱया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज आपल्या आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि आज आपल्या लाडक्या खेळाडूला, क्रिकेटच्या देवाला जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाच्या रुपाने अवघं विश्व मुंबईत अवतरलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांनी-चाहत्यांनी सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव केला.































































