सचिनचा गुंतवणुकीतही ‘मास्टरस्ट्रोक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आझाद इंजिनीअरिंग कंपनीचा शेअर गुरुवारी लिस्ट झाला. या लिस्टिंगसोबत सचिन तेंडुलकरला आझाद इंजिनीअरिंगमधून 531 टक्क्यांचा जबरदस्त नफा मिळाला आहे. सचिनने 9 महिन्यांपूर्वी या कंपनीत 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या आयपीओतून सचिनला 26.5 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. सचिनने 6 मार्चला या कंपनीचे 5 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. आयपीओ लिस्ट होण्याआधी सचिन तेंडुलकरकडे कंपनीचे 438210 शेअर्स होते.