सचिन तेंडुलकर घेतोय एका वेटरचा शोध, पण का? वाचा बातमी..

1348

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्या फलंदाजीतील आक्रमकता आणि कलात्मकता वाढवण्यास मदत करणाऱ्या एल्बो गार्डच्या डिझाइनची सूचना करणाऱ्या हॉटेलातील वेटरचा शोध घेतोय. या वेटरच्या सूचनेमुळे आपल्याला मनगटी फटके अधिक प्रभावीपणे मारता आले असे सचिनने स्पष्ट केले आहे.

सचिनने सोशल साईटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत त्याला एल्बो गार्डचे डिझाइन बदल अशी सूचना करणाऱ्या चेन्नईच्या वेटरचे खास आभार मानले आहेत. ‘एका कसोटी मालिकेत खेळात असताना चेन्नईतील हॉटेलात हा वेटर आपल्याला भेटला होता. तो कॉफी घेऊन माझ्या रूममध्ये आला होता. त्याने तुझ्या एल्बो गार्डचे डिझाइन बदल असा सल्ला मला दिला होता. मी त्याचा सल्ला मानून एल्बो गार्डचे स्वरूप बदलल्यावर माझ्या फलंदाजीत अधिक कलात्मकता आणि आक्रमकपणा आला,’ असे सचिनने म्हटले आहे.

सचिन आपल्या व्हिडीओ पुढे म्हणला आहे की, ‘माझ्या फलंदाजीच्या तंत्रातील उणीव अचूक हेरून मला एल्बो गार्ड बदलायला सांगणारा वेटर जगातला पहिला क्रिकेट शौकीन होता. त्याचे म्हणणे मीही मानले आणि मला त्याचा लाभ झाला म्हणून मी त्या वेटरला शोधतोय. कुणाला त्याचा थांगपत्ता लागला तर मला जरूर कळवा अशी विनंतीही सचिनने त्याच्या चाहत्यांना केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या