तो कायम मी सांगेल त्याच्या विरुद्धच वागतो, सचिन तेंडुलकरने माजी खेळाडूबाबत शेअर केला किस्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला हिंदुस्थानात क्रिकेटचा देव मानलं जातं. त्याने सल्ला देणं म्हणजे एखाद्या नवोदित खेळाडूसाठी मोठी शिकवणच ठरते. मात्र चक्क हिंदुस्थानात एक असा खेळाडूही आहे जो सचिन सांगेल त्याच्या अगदी विरुद्धच वागतो. सचिनने स्वत: त्या खेळाडूबाबत सांगितले आहे. तो खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग आहे.

विरू पाजीचा आज 45 वा वाढदिवस. देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विरेंद्र सेहवाग हा कायम त्याच्या मजेशीर ट्विटमुळे चर्चेत असतो. कधी कुणाची फिरकी घ्यायची, कधी सहज शब्दात कुणाला टोला लगावायचा असे धमाल ट्विट्स तो करत असतो. मात्र आज त्याच्या वाढदिवशी सचिन तेंडुलकरने त्याची फिरकी घेतली आहे.

”एकदा आम्ही एकत्र मैदानावर होतो. त्यावेळी मी त्याला थोडं आरामात खेळायला सांगितले. त्याने ओके म्हटले. पण पुढच्याच बॉलला त्याने एक जोरदार चौकार मारला. मी जे सांगेन त्याच्या कायम अगदी विरुद्ध वागणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यामुळे आज मी त्याला हा वाढदिवस खूप बोरिंगरित्या साजरा कर असे सांगणार आहे’, असे ट्विट सचिनने केले आहे.