सचिनची प्रकृती बिघडली, चाहते चिंताग्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

सचिनची प्रकृती बिघडल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. तो गेल्या तीन दिवसांपासून नीट जेवला नसल्याचंही समजतंय. संभाजीनगरच्या प्राणीसंग्रालयातल्या सचिन नावाच्या पांढरा वाघाच्या प्रकृतीत सुधार व्हावा यासाठी तज्ज्ञ डॉक्टर बोलवले जाणार आहेत.

संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेला सचिन नावाचा पांढरा वाघ आहे. सचिन २० ऑगस्टपासून आजारी पडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो नीट काही खातही नाही. त्यामुळे त्याला उपचारासाठी उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला दोन सलाईन आणि एक इंजेक्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे सचिन लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत.

सिद्धार्थ प्राणीसंग्राहलयात 18 जानेवारी 2004 साली शामू आणि सीता या वाघ्यांच्या जोडीने सचिनला जन्म दिला होता. सचिनचे वय १५ वर्ष आहे. या प्राणीसंग्राहलयात एकूण 9 वाघ आहेत. त्यामध्ये सात पट्टेरी वाघ असून त्यापैकी 3 नर व 4 माद्या आणि 2 पांढरे वाघ आहेत.