
हिंदुस्थानचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आज मैदानात खेळत नसला तरी मैदानाबाहेर राहून तो साऱयांची मनं जिंकतोय. सचिनने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो जखमी झालेल्या पक्ष्याचे प्राण वाचवताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये सचिनच्या हातात जखमी पक्षी दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हा व्हिडीओ आहे. किनाऱ्यावरच सचिनला पक्षी जखमी अवस्थेत सापडला आहे. सचिन पक्ष्याला अलगद उचलतो आणि म्हणतो, याचे प्राण नक्की वाचतील. त्यानंतर तो नजीकच्या रेस्तरॉँमध्ये पक्ष्याला घेऊन जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिथे पक्ष्यासाठी खाणे आणण्यास कर्मचाऱयाला सांगतो. जखमी पक्ष्याला दाणापाणी देतो. त्यानंतर सचिन पक्ष्याला डॉक्टरकडे घेऊन जातो. पक्ष्याचा एक पाय तुटल्याचे डॉक्टर सांगतात. या सर्व घटनाक्रमांचा व्हिडीओ सचिनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. थोडीशी काळजी आणि आपुलकीने आपले जग आणखी सुंदर बनू शकते, अशी कॅप्शनही सचिनने लिहिली आहे. हा व्हिडीओ बघून नेटीजन्स सचिनचे भरपूर कौतुक करत आहेत. व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात शेअर होत आहे.

























































