
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्राचे लाडके दैवत विठुमाऊलीवर आधारित ‘विठ्ठल’ चित्रपटाची चर्चा सध्या इंडस्ट्रीत रंगली आहे. अभिनेता सचित पाटील विठ्ठलाची भूमिका करणार आहे. राजीव रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल नेटवर्किंग साइटवर लाँच करण्यात आले. सावळ्या विठ्ठलाचे मनोहारी रूप दाखवणाऱ्या पोस्टरवर सचित दिसत असून त्याचा विठ्ठल अवतार प्रेक्षकांना भावत आहे. हा सिनेमा 14 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.


























































