धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे विचार स्पष्ट होतात, सदाभाऊ खोत यांची टीका

1769

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जी टीका केली त्यावरून राष्ट्रवादीची विचारसरणी स्पष्ट होते अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच या निवडणुकीत मतदार धनंजय मुंडे यांना जागा दाखवतील असेही खोत म्हणाले.

पंकजा मुंडे यांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे. धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केले ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी पक्षाची आणि नेत्यांची काय विचारसरणी आहे हे स्पष्ट होते. या निवडणुकीत मतदार धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच धनंजय मुंडे यांनी पैश्यांच्या जोरावर राजकारणात झुंडशाही आणण्याचा प्रयत्न केला. त्याला महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या