
2008 च्या मालेगाक बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने कारवाईचा इशारा देताच भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर मंगळवारी सुनावणीला हजर झाल्या. या खटल्यात सध्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अन्कये आरोपींचे जबाब नोंदवले जात आहेत.
भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग या मुख्य आरोपी असूनही सुनावणीला गैरहजर राहत होत्या. त्याची गंभीर दखल घेत विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांना कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे अखेर मंगळवारी साध्वी प्रज्ञासिंग यांनी विशेष न्यायालयात व्यक्तिश: हजेरी लावली.






























































