
सामना ऑनलाइन । मुंबई
गोकुळाष्टमी हा सण देशभरात उत्सवात साजरा होतो. या दिवशी अनेक गोविंदा पथकं हंडी फोडण्यासाठी रस्त्यावर उतरतात. पण या सणाला गालबाेट लागू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक असते.
* गोविंदांनी सकाळी नाश्ता करावा.
* भरपूर पाणी प्यावे.
* तेलकट व मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
* तासाच्या अंतराने फळांचा रस किंवा ग्लुकोज पावडर घ्यावी.
* शक्यतो सूळसूळीत कपडे घालू नयेत.
* हेल्मेट आणि सेफ्टी जॅकेटचा वापर करावा.
* या दिवशी महिला गोविंदांनी विशेष काळजी घ्यावी.
* महिलांनी गर्दीच्या ठिकाणी सावध रहावे.
* महिला गोविंदांनी आपलं पथक सोडून इतरत्र जाऊ नये.
* गाड्या चालवताना वाहतूकीचे नियम पाळा, ओव्हर टेक करण, अती वेगाने गाड्या चालवू नका
* गोविंदा पथकांनी स्वत:जवळ प्राथमिक उपचाराची साधनं ठेवायला हवी,






























































