सैनिक स्कूलसाठी पाचवी ऐवजी चौथीचा विद्यार्थी ठरला पात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । निलंगा

सावरीतील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील चौथीत शिकणारा सगरे आदित्य बलवान या विद्यार्थ्यास शिक्षकांनी सैनिक स्कूलच्या पात्रता परीक्षेस बसवण्याचे धाडस केले आणि हा विद्यार्थी पात्र ठरला आहे.

सैनिक स्कूल सातारा येथे प्रवेश घेण्यासाठी इयत्ता पाचवी वर्गातील किंवा सहावीतील विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. प्रवेश परीक्षेत पात्र होऊन मेरीट लिस्टमध्ये आल्यानंतर सैनिक स्कूलमध्ये सहावीत प्रवेश मिळतो. या परीक्षेसाठी वयाची अट असते. म्हणून सावरी गावातील सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची ज्यांनी सुरूवात केली असे कै. व्यंकटराव मोरे गुरुजी यांनी त्यांच्या काळात इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांची चूनुक पाहून त्या विद्यार्थ्यास चौथीतच असताना प्रवेश परीक्षेसाठी बसवले आणि तो पासही झाला तो आज उमरगा शहरात सुप्रसिद्ध डॉक्टर आहे. त्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन सावरीतील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावरी या शाळेतील चौथीत शिकणारा सगरे आदित्य बलवान या विद्यार्थ्यास शिक्षकांनी या परीक्षेस बसवण्याचे धाडस केले आणि हाही विद्यार्थी पात्र ठरला आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांचे व हितेंद्र मोरे सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.