सहकारनगरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

भरधाव दुचाकीचालकाने दिलेल्या धडकेत 60 वर्षीय पादचारी नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री सहकारनगमधील शिंदे हायस्कूल समोरील रस्त्यावर घडला.

आप्पा कोंडीबा जानगवळी (वय 60, रा. गवळीवाडा, सारंग सोसायटी, सहकारनगर) असे ठार झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीचालक निशांत सुरेश गवळी (वय 21, रा. पंचरत्न सोसायटी, धनकवडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोठीराम आप्पाजी जानगवळी (वय 33) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवारी रात्री नऊ वाजता आप्पाजी जानगवळी हे शिंदे हायस्कूल समोरील रस्त्यावरून पायी जात होते. त्यावेळी निशांत सुरेश गवळी याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव दुचाकी चालवत त्यांना जोराची धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने आप्पाजी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.