शिवसेना, युवासेना आयोजित साहेब चषक क्रिकेट आजपासून ; शाखा क्र.23 च्या वतीने  कांदिवलीत आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आणि युवासेना शाखा क्रमांक 23च्या वतीने कांदिवली (पूर्व) येथील 90 फिट रोडवरील क्रीडांगणात मर्यादित षटकांच्या साहेब चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उद्या शनिवार 9 एप्रिलपासून करण्यात आले आहे. शाखाप्रमुख संजय मांजरे हे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. ही स्पर्धा रविवार 10 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

दोन दिवस सायंकाळी  4 ते रात्री  10 या वेळेत खेळवल्या जाणाऱया या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रुपये 51 हजार आणि साहेब चषक, तर उपविजेत्या संघास रोख रुपये 25 हजार आणि चषक बहाल करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन आणि पारितोषिक वितरणाला महापौर  किशोरी पेडणेकर, आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू, शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, उपमहापौर अॅडव्होकेट सुहास वाडकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.