आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल हॉटेलमध्ये 20,500 रुपयांपर्यंत पगारवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे परळच्या आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना 20 हजार 500 रुपयापर्यंत भरघोस पगारवाढ मिळणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

नुकताच भारतीय कामगार सेना व आयटीसी मॅनेजमेंट यांच्यात चार वर्षांसाठी वेतनवाढ करार करण्यात आला. सदर करारात जास्तीत जास्त 20 हजार 500 रुपयांची पगारवाढ तसेच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 चे 60 करण्यात आले तसेच इतर सवलतीत वाढ करण्यात आली. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव तसेच आयटीसीचे व्हीपी  अतुल भल्ला, जनरल मॅनेजर भगवान बलानी, कुणाल पहावा, क्लस्टर एचआर हेड पॅप्टन सुभाष सिंग, आयटीसी एचआर हेड मेजर मनीष जुयल, एचआर हेड अनुराग मिश्रा यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

भारतीय कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष सचिन निकम, युनिट जनरल सेव्रेटरी रूपेश नाईक, संजय कांबळे, मल्लिकार्जुन धनशेट्टी, विनोद पवार, महादेव रानोसे, ऋषिकेश बेर्डे, हेमंत माने, गोपी साबुनकर, सचिन सुळे, समाधान चव्हाण हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.