
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी केल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी माफी मागितली आहे. आपले हिंदी चांगले नसल्याने आपल्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ काढला असेही पित्रोदा यांनी म्हटले आहे.
Sam Pitroda, Congress: What I meant was move on. We have other issues to discuss as to what BJP govt did and what it delivered. I feel sorry that my remark was misrepresented, I apologise. This has been blown out of proportion. https://t.co/PV5Im5hzce
— ANI (@ANI) May 10, 2019
पित्रोदा म्हणाले की, “जे झालं ते वाईट झालं असे मला म्हणायचे होते. मला वाईट या शब्दाचे भाषांतर नाही करता आले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. त्याबद्दल मी माफी मागतो.”
1984 च्या दंगलीबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता त्यावर पित्रोदा यांनी ८४ साली झालं ते झालं असे म्हणाले होते. त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते.

























































