
सॅमसंगने अत्याधुनिक स्मार्टफोन मालिकेमध्ये S9 हा मोबाईल 2018 साली बाजारात उतरवला होता. त्यावेळी या मोबाईलची किंमत ही 57,999 इतकी होती. मात्र आता हाच फोन अवघ्या 20 हजारांना मिळायला लागला आहे. 4जीबी रॅम आणि 64 जीबीच्या स्टोरेजची क्षमता असलेला हा फोन 19,999 रुपयांना मिळतोय. तर 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजची क्षमता असलेला हा फोन 24,999 रुपयांना मिळतोय. हा फोन इतक्या कमी दरात फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे.
ग्राहकांना वर दिलेल्या किंमतीपेक्षाही कमी दरात हा फोन मिळू शकतो, जर तुम्ही एसबीआयचं क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि तुम्ही हफ्त्यावर हा फोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला 10 टक्के सवलतीचा लाभ उचलता येईल. म्हणजेच 19,999 रुपयांचा फोन हा 18,000 रुपयांना मिळू शकेल. एक्स्चेंज ऑफरमध्ये घेतल्यास ग्राहकाला 12,100 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळू शकेल. तुम्ही अॅक्सिस बँकेचं बझ क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 5 टक्के सवलत मिळू शकेल.
हा मोबाईल फोन हा सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन आहे. जो 2018 साली बाजारात आणण्यात आला होता. जरी हा फोन जुना झाला असला तर त्याचे फिचर्स जबरदस्त आहे. वापरायला सोपा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असल्याने हा फोन प्रसिद्ध झाला होता. या मोबाईलसाठी अँड्रॉईड 10 अपडेट आधीच देण्यात आलं होतं. उत्तम डिस्प्ले, वारयलेस चार्जिंग, जबरदस्त कॅमेरा ही या मोबाईलची वैशिष्ट्ये आहेत.
या मोबाईलमध्ये 5.8 इंचाचा QHD सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑक्टा कोअर Exynos 9810 प्रोसेसर , 12 मेगापिक्सेलचा ड्युअल अपर्चर कॅमेरा, 960fps सुपर स्लोमोशन रेकॉर्डींग सुविधा या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. या मोबाईलमध्ये 3000mah ची बॅटरी देण्यात आली आहे.




























































