
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे वाळूमाफियांनी थैमान घातले आहे. करजुवे आणि वातवाडी येथे संक्शन पंप लावून वाळू उपसा सुरू आहे. करजुवे येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शनिवार आणि रविवारी वाळूमाफियांचे परिसरात धूमशान सुरु असते.
गेल्या काही वर्षांत करजुवे हा वाळू माफियांचा अड्डा झाला आहे.संक्शन पंप लावून वाळू उपसा केला जातो.करजुवे वातवाडी आणि सुर्वे वाडी येथे होणारे बेकायदेशीर वाळू उत्खनन हे पर्यावरणासाठी घातक आहे.पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी करजुवेतील वाळू उत्खननाबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही तहसीलदार आणि खनिकर्म विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
अधिकृत वाळू व्यवसायिक अडचणीत
बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे अधिकृत वाळू व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत.तसेच अनेक बांधकामाच्या ठिकाणी पांढऱ्या वाळूचे ढिगारे दिसतात अशा वाळूच्या ढिगाऱ्यांची प्रशासन चौकशी का करत नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.