सांगली मनपातील अभियंत्यांच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेतील नगरअभियंत्यांचे घर फोडून चोरटय़ांनी एक लाख 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरअभियंता परमेश्वर मल्लप्पा हलकुडे (वय 55, रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. परमेश्वर हलकुडे हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. यावेळी चोरटय़ांनी दरवाजाचे लॅचलॉक तोडून 90 हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 85 हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. बुधवारी हलकुडे परतले असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.