खडी ओझरे येथे पोलीस तपासणी नाका सुरू, कळकदरा मार्गावरील अवैध वाहतूकीला बसणार चाप

514

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापुर महामार्ग मुर्शी येथे चेक नाका असल्यामुळे अनेक जण कळकदरा या जोड रस्त्याचा वापर करून रत्नागिरीत विनापास शिरकाव करत असल्याचे समोर आले. कोरोना प्रादुर्भावामुळे या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे स्थानिकांकडून सातत्याने तक्रार केली जात होती. अखेर 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी ओझरे खुर्द येथे चेक नाक्याचा प्रारंभ झाला असून पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे. या आड मार्गावर मार्लेश्वर तीर्थक्षेत्र, देवरुख, रत्नागिरी, चिपळूणकडे जाण्यासाठी नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.

दरम्यान, हा चेक नाका कायम स्वरूपी ठेवण्यात आला तर गुन्हेगारी, चोरटी गुरांची वाहतूक, वाड्यातील गुरांची होणारी चोरीला आळ बसून गुन्हेगारांना चाप बसण्यास मदत होणार आहे. यासाठी आमदार शेखर निकम आणि आमदार राजन साळवी यांनीही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन दिले होते तर स्थानिक पंचायत समिती सदस्य जया मानेनी हि मागणी लावून धरली होती.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक -तुषार पाचपुते यांच्या देखरेखी खाली, पोलीस हेड कॉन्स्टेबल- संदेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल- किरण देसाई,प्रदिप पाटील, पोलीस नाईक- कदम, होम गार्ड संदेश जाधव, तेजस जाधव, ग्रामसेवक- नजीरोदिन मोहम्मद, पोलीस पाटील-सौ साक्षी जाधव, ओझरे सरपंच गीता हातीम, उपसरपंच पांडुरंग कदम, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी जाधव, गावातील गावकर मानकरी व ग्रामस्थ यांनी काही अवधीत तपासणी नाका सुरू करण्यास मोलाचे सहकार्य केले आहे

आपली प्रतिक्रिया द्या