संगमेश्वर – रेल्वेची धडक बसून गवा रेडा ठार

949

संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रेल्वेची धडक  बसून  गवा रेडा ठार झाल्याची घटना रविवारी घडली. धामणी यादववाडीतील ग्रामस्थांच्या विशेष सहकाऱ्याने सदर मृत गवा रेड्याची वनविभागाने  विल्हेवाट लावली. धामणी रेल्वे मार्गावर गवा रेडा मृत झाल्याची माहिती संगमेश्वर रेल्वे स्थानक प्रमूखानी देवरुख वन विभागाचे वनपाल सुरेश उपरे याना सायंकाळी दिली. वन विभागाचे विभागीय वनाधिकारी र. भि. भवर आणि रत्नागिरी येथील परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड  यांचे मार्गदर्शन नुसार उपरे यानी वनरक्षक नानू गावडे; शर्वरी कदम तसेच संतोष कदम दिनेश गुरव आदीसह घटनास्थळी दाखल झाले.सदर मृत गवा हा नर जाती आणि सात वर्षांचा होता. या अवाढव्य रेड्याची यादववाडीतील ग्रामस्थांचे सहकार्यामुळे विल्हेवाट लावण्यास मोलाची मदत झाल्याचे उपरे यानी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या