संगमनेरात 50 गोवंश जनावरांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कत्तलीसाठी टेम्पोतून घेऊन जात असलेल्या 50 गोवंश जनावरांची संगमनेर पोलिसांनी सुटका केली असून, एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अन्वर मोहम्मद कुरेशी (वय 29, रा. पुनर्वसन वसाहत, संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे.

सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोमवारी रात्री शहरात गस्त घालत होते. पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे गस्ती वाहन जोर्वेनाका परिसरात आले असता तेथून भरधाव जाणाऱया पिकअपवर त्यांना संशय आला. काही अंतर पाठलाग करीत त्यांनी त्या वाहनाला रोखले. वाहनाची तपासणी केली असता तब्बल 50 गोवंश जनावरांची वासरे अत्यंत निर्दयीपणाने एकमेकांचे गळे घट्ट बांधून त्या वाहनात कोंबल्याचे आढळले. पोलिसांनी वाहनचालक अन्वर कुरेशी याला ताब्यात घेत 50 गोवंश जनावरांना वासरांना सायखिंडीच्या जीवदया गोरक्षण संस्थेत जमा केले. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहन आणि 50 हजार रुपये किमतीचे एकूण पन्नास गोवंश वासरे असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी कॉन्स्टेबल सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अन्वर कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहन आणि 50 हजार रुपये किमतीची एकूण पन्नास गोवंश वासरे असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

कोपरगावात कत्तलखान्यावर छापा

शहरातील आयेशा कॉलनी भागातील कत्तलखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात काटवनात बांधलेल्या 16 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी वसीम फारुख कुरेशी (वय 18), अक्रम फकिर कुरेशी (वय 27), खलील जमाल कुरेशी (वय 36, सर्व रा. आएशा कॉलनी) यांना अटक करण्यात आली आहे.