सांगलीत कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. यासाठी एनडीआरएफच्या 22 जणांची एक तुकडी पाच बोटींसह सांगलीत दाखल झाली आहे.

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असली तरी सध्या आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी 11 फुटांपर्यंत पोहचली आहे. एनडीआरएफच्या टीमने आज नदीपात्रामध्ये बोटीच्या साहाय्याने पाहणी करत महापालिका अग्निशमन विभागाच्या मदतीने माहिती जाणून घेतली. 30 ऑगस्टपर्यंत एनडीआरएफची टीम सांगलीमध्ये राहणार आहे, अशी माहिती एनडीआरएफकडून देण्यात आल़ी