
सांगली महापालिका क्षेत्रात आजअखेर श्री बाप्पाची पर्यावरणपूरक विसर्जन मोहीम तसेच ‘मूर्तिदान मोहिमे’ला मोठा प्रतिसाद मिळाला. नदीपात्राऐवजी जलकुंडात घरगुती गणेशाचे मोठय़ा प्रमाणात विसर्जन करण्यात आले. आजअखेर एकूण 44,943 श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी साधारणपणे 41 टन निर्माल्य संकलन करण्यात आले. आजअखेर 77 टन निर्माल्य जमा झाले आहे. श्री मूर्तिदान, विसर्जन उपक्रमामध्ये नागरिकांचा वाढता सहभाग, हे मनपाने राबविलेल्या उपक्रमाचे यश आहे. या संकलन मोहिमेमुळे नदी-नाल्यांचे प्रदूषण रोखण्यात मोठी मदत झाली.
महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्तिदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी यंदा विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींची नोंद करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज दान आणि विसर्जन होणाऱया मूर्तींची नोंद केली जात आहे.
महापालिकेच्या पर्यावरण, आरोग्य विभागामार्फत मूर्तिदान मोहिमेचे निरीक्षण नियमितपणे केले जात आहे. तसेच मूर्तींचे दान झाल्यानंतर त्यांचे शास्त्र्ााsक्त व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची जबाबदारीदेखील पार पाडली जात आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती सहायक आयुक्त सहदेव कावडे, नागेश मद्राशी, सचिन सांगावकर, अनिस मुल्ला, मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, अतुल आठवले, पर्यावरण अभियंता अजित गुजराती यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, महापालिकेच्या मूर्तिदान उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱया नागरिकांसह सार्वजनिक मंडळांकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करताना महापालिकेच्या मूर्ती केंद्रांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातव्या दिवशी प्रभागनिहाय मूर्तिदान, विसर्जन
n प्रभाग समिती 1 ः मूर्ती दान – 248, कुंडात विसर्जन – 1838, नदीमध्ये विसर्जन – 14700. एकूण – 16786. n प्रभाग समिती 2 ः मूर्ती दान – 445, कुंडात विसर्जन – 6535, नदीमध्ये विसर्जन – शून्य. एकूण – 6980. n प्रभाग समिती 3 ः मूर्ती दान – 354, कुंडात विसर्जन – 6410, नदी मध्ये विसर्जन – शून्य, विहीर – 3764, एकूण – 10528. n प्रभाग समिती 4 ः मूर्तीदान – 106, कुंडात विसर्जन – 344, नदी मध्ये विसर्जन – 2000, गणेश तलाव – 125, एकूण – 3769.