संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठा पुराच्या विळख्यात, रामपेठवासीयांनी सोमवारची रात्र काढली जागून

संगमेश्वर तालुक्यात सलग पडणाऱ्या पावसांमुळे बाजारपेठांना पुराच्या पाण्याने वेढले असून माखजन, फुणगूस, संगमेश्वर, रामपेठ मधील काही दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. बाजारपेठेतील रहिवाशांनी आणि दुकानदारांनी सोमवारची रात्र पुराच्या भीतीमुळे जागूनच काढली.

संगमेश्वर तालुक्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे शास्त्री, सोनवी आणि बावनदी पाणी बाजारपेठेमुळे घुसले आहे. त्यामुळे दुकानांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री तीन वाजता अचानक पाणी दुकानामध्ये आणि घरांमध्ये घुसू लागल्याने एकच धांदल उडाली. दुकानातील माल लगेच बाहेर काढण्यात आला तसेच अगोदरच सावध झालेल्या दुकानदारांनी घर चालकांनी बाहेर पडल्याने मोठे नुकसान झाले नाही.मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने हळूहळू पाणी ओसरू लागले आहे.मुसळधार पावसामुळे आणि गणपती उत्सवाच्या अगोदरच बाजारपेठांमध्ये मंदीचे सावट पसरले असून ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र संगमेश्वर तालुक्यात दिसून येत आहे.

बावनदी पुलावरून वाहतूक एकेरी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी,शास्त्री आणि सोनवी धोकादायक पातळी ओलांडली असून पुलांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच बावनदी आणि शास्त्री पुलावरून रात्री एकेरीच वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती.