
हिंदुस्थानी टेनिसपटू सानिया मिर्झाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती आरशात बघताना दिसत आहे. सोबत तिने फक्त एक शब्द ‘Reflect’ एवढाच लिहिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांनी ही पोस्ट आली आहे. अभिनेता सना जावेदसोबत शोएबच्या लग्नानंतर, मिर्झाच्या कुटुंबाने सोशल मीडियावर पुष्टी केली की तिचा आणि शोएबचा घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटाने हाय-प्रोफाइल विवाहाचा शेवट दाखवला असला तरी पुन्हा एकदा चर्चेला वाट मिळाली.
‘सानियाने तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच लोकांपासून दूर ठेवले आहे. आज शोएब आणि तिचा घटस्फोट होऊन काही महिने झाले आहेत. शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी तिने शुभेच्छा दिल्या आहेत!’, असं मिर्झाची बहीण अनाम मिर्झानं आपली निवेदन पोस्ट करताना म्हटलं आहे.
View this post on Instagram
‘तिच्या आयुष्याच्या या संवेदनशील काळात, आम्ही सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी कोणत्याही चर्चांमध्ये गुंतून राहू नये. तिच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करावा’, असं निवेदनात म्हटलं आहे.
View this post on Instagram
हैदराबादमध्ये एप्रिल 2010 मध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा विवाह झाला होता, ज्यावरून प्रचंड टिका झाली होती. मलिकने इंस्टाग्रामवर मिर्झाला अनफॉलो केल्यावर चर्चांना उधाण आलं होतं. नंतर शोएब मलिकेचे नव्या विवाहाचे फोटो प्रसिद्ध झाले. त्यामुळे सानिया सोबतच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं. त्यांना पाच वर्षांचा मुलगा इझान आहे, जो सध्या सानियासोबत राहतो.































































