Video – चंद्रपूरमध्ये बांबूपासून सॅनिटायझर स्टँडची निर्मिती

474

चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायजर स्टँडची निर्मिती केली आली. बांबूच्या विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी हे केंद्र प्रसिद्ध आहे. यापूर्वी बांबूपासून सायकल निर्मिती करून या केंद्रानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

सातत्यानं नवनवीन प्रयोग करून बांबूचं महत्त्व या केंद्रानं पटवून दिलं. आता सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी केला जात आहे. पण त्यासाठी हाताचा वापर करावा लागतो. हीच बाब हेरुन या केंद्रानं एक स्टँड तयार केला असून, यात पॅडल मारून सॅनिटायजर घेता येतं. त्यामुळं सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय कार्यालयात याचा वापर उपयुक्त ठरू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या